श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची विजय संकल्प रॅली, इचलकरंजी, जिल्हा- कोल्हापूर

महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी बीजेपी सरकारच्या शहरी नागरिकांच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न मांडले तसेच श्री. राजू शेट्टी यांच्या स्वार्थी राजकारणी कृतींवर टीका केली.
इचलकरंजी शहर कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे, तसेच या शहराला असणारे औद्योगिक महत्त्वही सर्वमान्य आहे. नुकतेच बीजेपी तर्फे 2019 निवडणूक मोहिमेअंतर्गत इचलकरंजी येथे विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणांमध्ये बीजेपी सरकारच्या शहरी नागरिकांच्या प्रगती आणि सुख- सुविधांसाठी केलेल्या विविध कार्यांचा उल्लेख यावेळी भाषणामध्ये केला.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच कृषि मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोत यांच्या घणाघाती भाषणाची स्तुती केली. श्री. पाटील पुढे म्हणाले की आमच्या सरकारने आयकराची मर्यादा पाच लाख पर्यंत वाढवली. याचा फायदा शहरी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. अगोदरच्या सर्व सरकारने यासंदर्भात फक्त आश्वासने आणि घोषणा दिल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात पुढे कार्य केले नव्हते.
महसूलमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या सहकार मंत्री म्हणून असणाऱ्या कारकीर्दीतील काही निर्णयांचा उल्लेख केला. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक वस्त्रोद्योग कंपन्यांना प्रगतीसाठी आणि टिकून राहण्यासाठी मदत झालेली आहे. अनेक वस्त्रोद्योग गिरण्यांना आजही बीजेपी सरकारच्या अखत्यारीत सध्याचे मंत्री श्री. सुभाष देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कर्ज उपलब्धता सहजतेने झालेली आहे.
कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी फडणवीस सरकारचे महत्त्वाचे योगदान या वेळी स्पष्ट केले. ते असे म्हणाले की मराठा आरक्षण ही बीजेपी सरकारची एक मोठी यशस्वी झेप आहे. यापूर्वी 1902 मध्ये स्वर्गीय छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते, परंतु 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर ते लुप्त झाले. त्यानंतर 1968 मध्ये माथाडी कामगार नेते स्वर्गीय श्री. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी खूप प्रयत्न केले आणि त्यामध्ये त्यांना अपयश आल्यामुळे त्यांनी 1968 मध्ये आत्महत्या केली. श्री. पाटील पुढे म्हणाले की आज महाराष्ट्रात 99% शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या अखत्यारित आहेत, परंतु त्यापैकी कोणीही मराठा विद्यार्थ्यांना मोफत अथवा फी मध्ये सूट देऊन शिक्षण दिले नाही. तसेच अगोदरच्या कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत. आमच्या सरकारने न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे 16% आरक्षण मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये दिलेले आहे. आज सरकारने 546 कोटी रुपये मराठा विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी भरले आहेत आणि 50 टक्के शुल्क सरकार भरणार आहे. चार लाख 72 हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. तसेच मराठा तरुणांना व्याजमुक्त कराची ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे जवळपास तीन लाख रुपये व्याज कर्जदारांना भरावे लागत नाही.
महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी बीजेपी सरकारची धनगर समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीने दाखवलेली भूमिका देखील स्पष्ट केली. हे आरक्षण मिळवण्यासाठी सरकारला या संस्थेकडून संशोधन अहवाल मागून तो सादर करावा लागला आणि त्यामुळे आता असे सिद्ध झाले आहे की धनगड नावाची कोणती जातच महाराष्ट्रामध्ये नाही. यासाठी लागणारे शपथपत्रही महाराष्ट्र सरकारने दिले आहे आणि यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मार्ग आता सोपा झाला आहे. या अगोदरचे सर्व सरकार फक्त दोन ओळीचे निवेदन पाठवून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे विनंती करत असत आणि जी दरवेळी कागदपत्रांअभावी फेटाळली जात असे. आता हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असून निकाल येईपर्यंत महाराष्ट्र सरकार धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व सुविधा आणि फायदे देण्यास बांधील आहे. ज्यामध्ये ट्युशन फी, वसतिगृहे यांचा समावेश होतो. दोन्ही मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय हे लोकहिताचे आहेत आणि लोकांना आधार व ताकद देणारे आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा बीजेपी सरकार परत येणे आवश्यक आहे.
आपल्या भाषणाच्या पुढील भागामध्ये महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी आक्रमकपणे विरोधी उमेदवार श्री. राजू शेट्टी यांच्या स्वार्थी राजकारणी कृतींवर टीका केली. त्यांनी असे आवाहन केले की श्री. राजू शेट्टींना जर माझ्याविषयी काही तक्रारी असतील तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा उपयोग करून आणि पुरावे सादर करून अशा तक्रारी मांडाव्यात. कोल्हापूर मधील बिंदू चौक अशा तक्रारी मांडण्याचा योग्य मार्ग नाही आहे. श्री. पाटील यांनी श्री. राजू शेट्टी यांच्या स्वार्थी राजकारणी वृत्तीबद्दल स्पष्ट केले. जेव्हा श्री. सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसयांनी नियुक्त केले तेव्हा श्री. राजू शेट्टींनी नेहमी तक्रार केली होती, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी या तक्रारी गंभीरतेने घेतल्या नाहीत. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी श्री. राजू शेट्टींवर त्यांचे कारखानदार श्री. विशाल पाटील यांच्याशी असलेल्या राजकीय संबंधांवरही टीका केली व ते म्हणाले की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते त्यांना जवळचे वाटत नाहीत. श्री. पाटील पुढे असेही म्हणाले की खासदार असूनही त्यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी काहीही कार्य केले नाही. आमच्या संवेदनशील सरकारने एफ. आर. पी. वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्न केले आणि श्री. राजू शेट्टी यांनी मात्र यासाठी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
आपल्या भाषणाचा समारोप करताना कृषिमंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी लोकांना श्री. धैर्यशील माने यांना मतदान करून स्वार्थी आणि अनुभवी राजकारणी श्री. राजू शेट्टी यांना येत्या निवडणुकीत पराभूत करा असे सांगितले. ते पुढे म्हणाले की आम्ही इचलकरंजी मधून एक लाख मतांचा फायदा अपेक्षित करत आहोत. तसेच इथे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व ख्यातनाम व्यक्ती त्यांच्या भागांची काळजी घेण्यास सक्षम आहेत, ज्यामध्ये वाळवा, शाहूवाडी अशा भागांचा समावेश होतो. त्यांनी लोकांना 23 एप्रिलला प्रामाणिकपणे मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.
इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर आहे आणि त्यामुळे या शहराची भूमिका हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महत्त्वाची आहे. इचलकरंजीचे औद्योगिक महत्त्वही प्रसिद्ध आहे. या परिस्थितीत श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी शहरी लोकांना योग्य रीतीने साद घालून मतदानाचे आवाहन केले आहे आणि याचे चांगले परिणाम 2019 च्या निवडणूक निकालामधून दिसून येतील.

Comments

Popular posts from this blog

Agriculture Minister, Shri Chandrakant Patil, Announced Doordarshan Sahyadri Krishi Sanman Puraskar Winners

Mr.Chandrakant Patil In principle acceptance given to the regularization of the Panshet Flood Victim’s encroachment

Mr.Chandradadapatil On Savali Care Centre Will Provide Accommodation Facility to The Patients