Posts

Showing posts with the label Happy Birthday

एक वैभवशाली प्रवास-- वाढदिवस विशेष 10 जून 2019

Image
महाराष्ट्राचे महसूल, कृषी ,आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय  श्री. चंद्रकांत दादा पाटील ; ते त्यांचा साठावा वाढदिवस 10 जून 2019 रोजी साजरा करीत आहेत. त्यांच्या वैभवशाली, समृद्ध करणाऱ्या जीवन प्रवासाची ओळख करून घेण्यासाठी हा एक सुंदर दिवस आहे असं वाटत नाही का? कोणताच भपकेबाजपणा नाही, जाहिरातबाजी नाही, हा एका अशा माणसाचा प्रवास आहे ज्यांचे बालपण एका मजुरी करणाऱ्या कुटुंबामध्ये गेले, त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते आणि आता महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटमध्ये अनेक विभाग स्वतंत्रपणे सांभाळणारे मंत्री… माननीय  श्री. चंद्रकांत दादा पाटील  हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील, भुदरगड तालुक्यामधील, खानापूर या गावचे आहेत. त्यांचे वडील मुंबईमधील गिरणी कामगार होते. त्यांचे बालपण फारसे सुखकर नव्हते आणि लहानपणी त्यांना कामगारांच्या समस्या यांची माहिती झाली. 1980 मध्ये बीकॉम पूर्ण केल्यानंतर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1982 मध्ये त्यांची नियुक्ती प्रदेश मंत्री...