एक वैभवशाली प्रवास-- वाढदिवस विशेष 10 जून 2019
महाराष्ट्राचे महसूल, कृषी ,आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील; ते त्यांचा साठावा वाढदिवस 10 जून 2019 रोजी साजरा करीत आहेत. त्यांच्या वैभवशाली, समृद्ध करणाऱ्या जीवन प्रवासाची ओळख करून घेण्यासाठी हा एक सुंदर दिवस आहे असं वाटत नाही का? कोणताच भपकेबाजपणा नाही, जाहिरातबाजी नाही, हा एका अशा माणसाचा प्रवास आहे ज्यांचे बालपण एका मजुरी करणाऱ्या कुटुंबामध्ये गेले, त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते आणि आता महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटमध्ये अनेक विभाग स्वतंत्रपणे सांभाळणारे मंत्री…
माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील, भुदरगड तालुक्यामधील, खानापूर या गावचे आहेत. त्यांचे वडील मुंबईमधील गिरणी कामगार होते. त्यांचे बालपण फारसे सुखकर नव्हते आणि लहानपणी त्यांना कामगारांच्या समस्या यांची माहिती झाली. 1980 मध्ये बीकॉम पूर्ण केल्यानंतर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1982 मध्ये त्यांची नियुक्ती प्रदेश मंत्री म्हणून झाली. 1985 मध्ये माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील हे क्षेत्रीय संघटन मंत्री म्हणून नियुक्त झाले आणि यावेळी त्यांनी तरुण आणि विद्यार्थी वर्गांच्या समस्या अधोरेखित केल्या. 1990 मध्ये श्री. चंद्रकांत दादा पाटील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मंत्री म्हणून निवडून आले. त्यांची विचारपद्धती अत्यंत समृद्ध आहे, तसेच त्यांना माननीय श्री. अमित शहा आणि माननीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या समवेत काम करण्याची संधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दिवसांमध्ये लाभली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मजबूत योगदान दिल्यानंतर बीजेपीचे माजी सचिव स्वर्गीय श्री. प्रमोद महाजन यांनी त्यांना बीजेपी साठी काम करण्याची विनंती केली आणि त्यांच्या बीजेपीच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यांनी बीजेपीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केले आणि बीजेपीला कोल्हापूर, सांगली ,आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पश्चिम महाराष्ट्रातील बीजेपीच्या यशामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मागील वीस वर्षे ते पश्चिम महाराष्ट्रातील बीजेपीच्या वाढीसाठी सतर्क आहेत.
2014 मध्ये पदवीधर मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले, यामुळे त्यांच्या राजकीय जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली. त्यांनी पद्धतशीरपणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आर. एस. एस. आणि बीजेपीसाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रम केले. माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिमा अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ आहे. त्यांची कामाप्रती असणारी निष्ठा आणि साधेपणा सुप्रसिद्ध आहे आणि याचा फायदा त्यांना पश्चिम महाराष्ट्राचा नेतृत्वाचा योग्य चेहरा अशी ओळख मिळण्यात झालेला आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांची दखल घेतली जाते. नुकतेच 2019 च्या निवडणुकीमध्ये बीजेपीला मिळालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील भरघोस यशासाठी श्री. दादा पाटील श्रेयस्कर आहेत.
माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची नाविन्यपूर्ण नेतृत्वशैली आणि निर्णय क्षमता प्रशंसनीय आहेत. त्यांनी महसूल विभागासाठी घेतलेले अनेक निर्णय स्तुत्य आहेत. त्यांची शेतकऱ्यांप्रती असणारी काळजी दुष्काळ निवारण कार्यक्रमातून दिसून येते, तसेच शाळा आणि महाविद्यालयीन कार्यक्रमामधील त्यांचा सहभाग त्यांची विद्यार्थ्यांप्रतीची आस्था दर्शवतात. त्यांनी कोल्हापूर मधील विविध खेळाडूंना दिलेले दिलेले प्रोत्साहन दिसण्यात आलेले आहे, ज्यामध्ये अगदी तेजस्विनी सावंतचाही सहभाग आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुरू केलेले विविध प्रयत्न तसेच टोल रद्द करण्या सारखे निर्णय हे सिद्ध करतात की ते खरंच कर्तृत्ववान राजकारणी आहेत.
त्यांचे वैयक्तिक आयुष्य बुद्धिमान जीवनसाथी सौ. अंजली पाटील यांच्या सहवासाने सुगंधित झालेले आहे. त्या नेहमीच विविध सामाजिक अभियानांमध्ये माननीय श्री. दादा पाटील यांच्यासमवेत सहभागी होतात. ते दोघेही आदर्श वैवाहिक जीवनाची व्याख्या दर्शवतात आणि जिचे विविध पैलू जबाबदारी, वैचारिक प्रगल्भता, आणि काळजी हे आहेत. आम्ही माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देतो आणि अशी सदिच्छा व्यक्त करतो कि नवीन वर्षामध्ये त्यांना अधिकाधिक यश, जबाबदारी, आणि सन्मान प्राप्त होऊ दे.
Comments
Post a Comment