श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर येथील प्रचार सभा

महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी सभेमध्ये भाषणादरम्यान मोदी आणि फडणवीस सरकारच्या लोकांना सुखी, आनंदी आणि सुरक्षित करण्याच्या करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला.
कोल्हापूर जिल्हा हे महसूल आणि कृषी मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी नेहमीच घरचे मैदान राहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासासाठी नेहमीच सतर्क असतात. आत्ताच त्यांनी जयसिंगपूर, कोल्हापूर जिल्हा येथे एका सभेला उपस्थिती लावली. या सभेदरम्यान त्यांनी मतदान, लोकशाहीचे महत्त्व आणि बीजेपी सरकारच्या विविध कार्य पूर्ततेचा आढावा घेतला.
कृषी मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारतीय लोकशाहीचा उल्लेख केला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशी मजबूत यंत्रणा देशाला प्रदान करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी पुढे असेही सांगितले की भारतातील प्रत्येक नागरिक त्याच्या एका मताने सरकार नियुक्तीच्या यंत्रणेमध्ये सहभागी आहे. या लोकशाही पद्धतीमध्ये सर्व आर्थिक गटातील लोक एकाच पारड्यात समाविष्ट आहेत आणि लोकांना सरकारचे कार्य आणि लोकप्रियता यानुसार मतदान करून सरकार नियुक्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की ही निवडणूक ही पूर्णपणे एकतर्फी असणार आहे आणि पुन्हा एकदा मोदी सरकार नियुक्त न होण्यासाठी कोणतेच कारण नाही. ते पुढे असेही म्हणाले की जर आपण एखाद्या खेड्यांमधील 250 कुटुंबांचा आढावा घेतला तर त्यापैकी कमीत कमी 150 कुटुंबांना मोदी सरकारने आणलेल्या विविध योजना आणि निर्णयांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे निश्चित फायदा झालेला आहे. लोकांना कर्जमाफी, गॅस जोडणी, विद्युत पुरवठा, घरांसाठी कमी व्याजदर, शौचालय उपलब्धता, स्वतःचे घर अथवा सदनिका. आणि पाच लाख पर्यंतच्या उत्पन्नासाठी आयकर मुक्तता असे अनेक फायदे झालेले आहेत. या सर्वांबरोबरच आज बरीचशी कुटुंबे आयुष्मान भारत योजनेची लाभार्थी झालेली आहेत. भारतातील खूप कुटुंबांना या योजनेमुळे वैद्यकीय विमा सुरक्षा आणि आरोग्यविषयक पाच लाख रुपयांपर्यंतचे फायदे झालेले आहेत. या योजनेतील कार्ड सुविधेमुळे एका कुटुंबातील पाच व्यक्तींना वैद्यकीय चाचण्या, शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेनंतरची काळजी, औषधे अशा विविध गोष्टींसाठी लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातील 80 टक्के लोक या योजनेचे लाभार्थी आहेत.
या सर्व गोष्टी आणि सरकारचे काम खूप बोलके आहे आणि या मधून मोदी सरकार हेच पुन्हा येणार आहे ही गोष्ट सिद्ध होते. यासंदर्भात माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी कश्मीरचे नेते श्री. ओमर अब्दुल्ला यांनी मांडलेला एक प्रस्ताव उदाहरणादाखल दिला. श्री. ओमर अब्दुल्ला यांनी असा प्रस्ताव मांडला होता की दोन हजार एकोणीस च्या निवडणुका या एकतर्फी असणार, असून ती केवळ एक औपचारिकता असेल. त्यामुळे या निवडणुका रहित करून आपण वेळ आणि पैसे दोन्ही वाचवू शकतो आणि पुढची निवडणूक थेट 2024 मध्ये घेऊ शकतो. पुढे गमतीने ते असे म्हणाले की त्यांचा हा सल्ला फक्त श्री. शरद पवार यांनी गंभीरतेने घेतला परंतु बाकी त्यांच्या कुटुंबीयांनी हा मूल्यवान सल्ला नाकारला. दुर्दैवाने त्यांची कन्या आणि नातू आगामी निवडणुकांमध्ये अपयशाला सामोरे जातील.
आपल्या भाषणाच्या पुढील भागामध्ये महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी मोदी आणि फडणवीस सरकारच्या विविध प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी असे स्पष्ट केले की या सरकारने लोकांना सुखी, आनंदी आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त बारा रुपये वार्षिक हप्ता भरून दोन लाख रुपयांचा विमा लोकांना अपघाती निधन तसेच उपचार यासाठी उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांनाही पीक विम्याच्या माध्यमातून कोणत्याही नुकसानकारक परिस्थितीला सामोरे जाता येत आहे, ज्यामध्ये दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती ,कमी उत्पादन यांचा समावेश होतो. या पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना 10 पैकी फक्त 2.5 अशा प्रमाणात रुपये भरावे लागतात. उरलेली रक्कम ही राज्य आणि केंद्र सरकार भरते.
बारामतीला नुकतीच माननीय पंतप्रधान आणि बीजेपीचे अध्यक्ष श्री. अमित शहा यांची मोठी प्रचार सभा झाली आणि ही सभा सर्वात मोठी प्रचार सभा ठरली. यामधून लोकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद स्पष्ट होतो आणि विजयाची खात्री पटते. लोकांनी मोदी आणि फडणवीस सरकार हे आपल्याला आनंदी ,सुखी-समाधानी आणि सुरक्षित करण्यास सक्षम आहे हे मान्य केलेले आहे.
कृषी मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार श्री. राजू शेट्टी यांच्या शेतकरीविरोधी धोरणांवर देखील जोरदार टीका केली. ते असे म्हणाले की या व्यक्तीने वेगवेगळ्या खुणा वापरून जुन्या निवडणुका जिंकल्या आहेत,परंतु शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात त्यांनी कधीच रस घेतला नाही. प्रत्यक्षात त्यांचे प्रयत्न या समस्या अजून वाढवण्यासाठी होत राहिले. महाराष्ट्राचा मंत्री म्हणून मी त्यांची धोरणे जवळून पाहिलेली आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या एफआरपी वाढवण्याच्या कार्यामध्ये खूप अडथळे निर्माण केले होते. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा दुधासाठी पाच रुपये अनुदान देण्याचे स्पष्ट केले तेव्हा त्यांनी ते प्रकरण आंदोलने आणि मोर्चे काढून अजून वाढवले होते.
कृषि मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील पुढे असे म्हणाले की आज मला हे स्पष्ट करताना अतिशय आनंद होत आहे की आमच्या सरकारमध्ये कोणतेच मोर्चे, आंदोलने अथवा घोटाळे राज्यात दिसून आले नाहीत. फडणवीस सरकारने सर्वच समस्या नेहमी शांततेने आणि चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज आपण पाच वर्षे शांतता पूर्ण नेतृत्व अनुभवू शकलो. जेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू करणार असल्याचे ठरवले, तेव्हा माननीय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मला तिकडे लक्ष देण्यास सांगितले. मी ताबडतोब या शेतकऱ्यांबरोबर बैठक घेऊन त्यांच्या कर्जमाफीच्या मागण्या पूर्ण केल्या. आमच्या सरकारने सर्वाधिक कर्जमाफी दिली आहे आणि 52 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे. आमची कर्जमाफीची रक्कम ही 34000 करोड असून काँग्रेस सरकारच्या कारकीर्दीमध्ये ही रक्कम चार हजार करोड होती.
अनुभवी मंत्री असणाऱ्या श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी बीजेपी आणि शिवसेना युतीचे उमेदवार श्री. धैर्यशील माने यांची देखील स्तुती केली. ते असे म्हणाले की या तरुण आणि बुद्धिमान व्यक्तीकडे शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या आणि स्त्रियांच्या समस्या समजून घेण्यासाठी असणारा दृष्टिकोण आहे. तसेच या समस्या सोडवून समाजाच्या हितासाठी कार्य करण्याची त्यांची क्षमता आहे.
आपल्या भाषणाचा समारोप करताना श्री. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की आमच्या सरकारचे योगदान काही गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्ण आहे, कारण या गोष्टी कार्यपूर्तीचा उच्चांक ठरतात,ज्यामध्ये मराठा जातीला आरक्षण, धनगर जातीला आरक्षण यांचा समावेश होतो. ते असे म्हणाले की मराठा जातीला आरक्षणाची मागणी 1968 पासून प्रलंबित आहे. परंतु कोणत्याच अगोदरच्या सरकारने यासाठी प्रयत्न केले नाहीत. तसेच बहुतांश शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या अखत्यारीत असून, त्यापैकी कोणीही मराठा तरुणांना मोफत शिक्षण देऊ केले नाही.आज आमचे सरकार मराठा जातीला 16% आरक्षण नोकरी आणि शिक्षणासाठी देण्यात यशस्वी झाले आहे आणि या निर्णयाचा मराठा जातीच्या अनेक पिढ्यांना फायदा होणार आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पूर्वीचे सरकार फक्त केंद्र सरकारकडे निवेदन पाठवीत असत आणि अधिकृत कागदपत्रांचा अभाव असल्याने ती रद्द केली जात होती. आमच्या सरकारने या निवेदनाबरोबर टीआयएसएस या संस्थेकडून मिळालेला अहवालही जोडला. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये धनगर आणि धनगड या दोन्ही जाती एकच समजल्या जाणार असून सर्व आदिवासी जमातींचे फायदे आता धनगर समाजाला प्राप्त होतील.
मोदी सरकारने आर्थिक निकषांवरही दहा टक्के आरक्षण लागू केले आहे आणि त्यामुळे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना आता या ऐतिहासिक निर्णयामुळे दहा टक्के आरक्षणाचा लाभ होऊ शकेल.
आपल्या भाषणाच्या शेवटी महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी बीजेपी शिवसेना उमेदवार श्री. धैर्यशील माने यांना मत देण्याची विनंती केली.
2019 च्या निवडणूक मोहिमांमध्ये श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची भाषणे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत कारण ते खऱ्या अर्थाने कार्यपूर्ती करणारे आणि जनसामान्यांचे मंत्री आहेत.

Comments

Popular posts from this blog

Agriculture Minister, Shri Chandrakant Patil, Announced Doordarshan Sahyadri Krishi Sanman Puraskar Winners

Mr.Chandrakant Patil In principle acceptance given to the regularization of the Panshet Flood Victim’s encroachment

Mr.Chandradadapatil On Savali Care Centre Will Provide Accommodation Facility to The Patients