धनगर समाज आणि शेतमजूर मेळावा कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर
कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी धनगर समाजाला त्यांच्या आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भात आणि शेती मजुरांना त्यांच्या निवृत्तीवेतन, घरे आणि अतिक्रमणाच्या नियमितीकरण संदर्भात आश्वस्त केले.
2019 चा निवडणुकांसाठी बीजेपीच्या निवडणूक मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांची प्रगती, मराठा आणि धनगर जातींना आरक्षण ,आयुष्मान भारत योजना अशा विविध मुद्द्यांचा प्रचार केला गेला आहे. नुकतीच महसूल आणि कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी धनगर समाज आणि शेतमजुर मेळावा, कुरुंदवाड येथे उपस्थिती लावली, त्यावेळी त्यांनी बीजेपी सरकारच्या राज्य आणि देश पातळीवरील वेगवेगळ्या प्रयत्नांची माहिती दिली ज्याचा फायदा समाजाला आणि कृषी उद्योगाला होऊ शकेल.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच “येळकोट येळकोट जय मल्हार” असे म्हणून श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्वांना सुखद धक्का दिला, कारण या समाजाचे प्रमुख दैवत खंडोबा मानले गेले आहे. महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढे असा दावा केला की इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मोदी सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा निश्चित फायदा झालेला आहे आणि म्हणूनच पुन्हा या देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय श्री. मोदी जी यांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. इथे असलेल्या कुटुंबीयांपैकी प्रत्येक कुटुंबाला मोफत शौचालय, कर्जमाफी ,गॅस जोडणी ,विद्युत पुरवठा, अशा काही ना काही रुपात नक्कीच फायदा झालेला आहे. याशिवाय खूप कुटुंबांना नुकत्याच झालेल्या आयुष्यमान भारत या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबातील पाच व्यक्तींना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा कवच आणि औषधे व आरोग्यविषयक सुविधांसाठी मदत प्राप्त होते. अशाप्रकारे प्रत्येक कुटुंबाला आज मोदी सरकारने आणलेल्या योजनांचा निश्चित फायदा झालेला आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते की सर्वांचे आयुष्य सुरक्षित, आनंदी, श्रीमंत,आणि सुखी पाहायचे असेल तर केंद्रामध्ये माननीय श्री. मोदीजी पंतप्रधान असल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.
महसूल मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले की बीजेपी सरकारच्या विविध गौरवशाली कार्यांची मोठी यादी आहे. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळवलेले मोठे यश मराठा जातीच्या आरक्षणासंदर्भात आहे. मराठा जातीच्या आरक्षणाची मागणी 1968 पासून प्रलंबित आहे. यापूर्वीचे मराठा मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांनीदेखील मराठा आरक्षणासंदर्भात अशी असे विधान केले होते की मराठा जात ही मागास मानली जात नाही आणि त्यामुळे त्यांना आरक्षण दिले जाऊ शकत नाही. परंतु ब्राह्मण मुख्यमंत्री असणा-या श्री फडणवीस यांनी चमत्कार करून दाखवला आहे आणि आज मराठा जातीला 16% आरक्षण नोकरी आणि शिक्षणामध्ये उपलब्ध झालेले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवीत्तर कोर्सेसच्या प्रवेशाची सुरुवात नवीन पद्धतीने आरक्षण लागू करून झालेली आहे.
कृषि मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी बीजेपी सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी वापरलेले धोरणही स्पष्ट केले. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि आणि ही मागणी अधिक सशक्त करण्यासाठी फडणवीस सरकारने टीआयएसएस या संस्थेचा संशोधन अहवाल मागणी सोबत सादर केला आहे. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या या पद्धतशीर दृष्टिकोनामुळे यांना आता धनगड आणि धनगर या दोन जातींमध्ये असणारा गोंधळ कायदेशीररीत्या मिटवता येईल आणि या संदर्भातील न्यायालयीन निकाल हाती येईपर्यंत राज्य सरकार धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना आणि फायदे लागू करण्यास बांधील आहे, यामध्ये शुल्क, वस्तीगृहे इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनाही आज सरकारने त्यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देऊन मानवंदना दिली आहे.
माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी आर्थिक निकषांवर लागू केलेल्या आरक्षणाचा ही उल्लेख केला. जातीऐवजी आर्थिक निकषांवर बीजेपी सरकारने आरक्षण लागू करून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे अशा कुटुंबांना फायदा होईल ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे. ते पुढे असे म्हणाले की मराठा, धनगर जातीचे आरक्षण आणि आर्थिक निकषांवर लागू झालेले आरक्षण याचा महाराष्ट्रातील लोकांच्या पुढील कितीतरी पिढ्यांना निश्चित फायदा होणार आहे आणि म्हणूनच हेच सरकार पुन्हा एकदा नियुक्त होणे गरजेचे आहे.
आपल्या भाषणाच्या पुढील भागामध्ये त्यांनी शेतमजुरांना त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आश्वासन देऊन त्याची पूर्तता लवकरच होईल असा विश्वास दिला. ते असे म्हणाले की शेतमजूर हे कष्टकरी असून त्यांना लवकरच केंद्र शासनाकडून मासिक निवृत्तीवेतन योजना लागू होईल, याचा उपयोग त्यांना साठ वर्षानंतर होऊ शकेल. तसेच शेतमजुरांची घरे आणि अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. ते असेही म्हणाले की शेतमजुरांना देण्यात येणारी निवृत्तीवेतन योजनेची रक्कम तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेची रक्कम यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यांनी शेतमजुरांना ठोस आश्वासन दिले की यासाठी निश्चित पावले उचलली जातील.
आपल्या भाषणाचा समारोप करताना महसूल मंत्री पुढे असे म्हणाले की विरोधी पक्षाचे उमेदवार श्री. राजू शेट्टी यांच्याबद्दल मला फारसे काही बोलावेसे वाटत नाही. कारण त्यांनी अशा पक्षाची साथ दिली आहे ज्या पक्षाने शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय केला आहे. श्री पाटील यांनी लोकांना शिवसेना उमेदवार श्री. धैर्यशील माने यांना येत्या निवडणुकीत विजयी करा असे आवाहन केले. कारण बीजेपी-शिवसेना युतीच्या उमेदवारांचा विजय होणे माननीय पंतप्रधानांच्या हातात देश सुरक्षित करण्यासाठी आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या दहा टक्के आहे, या परिस्थितीमध्ये धनगर समाज हा निवडणुकांच्या निकालांच्याबाबत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. बीजेपीने धनगर समाजाच्या फायद्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून उचललेली पावले फायदेशीर ठरतील आणि याचे परिणाम धनगर समाजाच्या बीजेपीला असलेल्या पाठिंब्यामधून दिसून येतील.
Comments
Post a Comment