सरूद ,हातकणंगले मतदारसंघ, येथे श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची झालेली प्रचारसभा

महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी लोकांना असे आवाहन केले की मोदी सरकारला विविध कार्य आणि प्रकल्पांच्या पूर्तीसाठी मत द्या तसेच त्यांनी असाही दावा केला की या प्रकल्पांचे पायाभूत कार्य पहिल्या कार्यकाळात पूर्ण झाले आहे.
आगामी निवडणुकीसाठी बीजेपीचे सर्व स्तरातील कार्यकर्ते अतिशय उत्साहाने कार्यरत आहेत आणि मोदी सरकारला पुन्हा एकदा केंद्रामध्ये पाहण्यासाठी कष्ट घेत आहेत. महसूल आणि कृषी मंत्री तसेच पश्चिम महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी आगामी निवडणुकांसाठी मजबूत धोरणांची अंमलबजावणी केली आहे. नुकतीच त्यांनी सरूद, तालुका-शाहूवाडी, हातकणंगले लोकसभा मतदार संघ येथे एक प्रचार सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशोगाथा तसेच सामान्य लोकांच्या भल्यासाठी केलेले प्रयत्न यावर भाष्य केले.
कृषी मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी सभेमध्ये माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीयांचे गुजरातच्या विकासाच्या दृष्टीने असणारे वेगवेगळे पैलू स्पष्ट केले. त्यांनी माननीय पंतप्रधानांची विविध निर्णयांसाठी स्तुती केली ज्यामध्ये प्रामुख्याने गुजरात राज्यातील पाण्याची कमतरता आणि पाण्याचे व्यवस्थापन याचा समावेश होतो.गुजरात मधील कच्छ सारख्या वाळवंटी प्रदेशांमध्ये ही पाण्याच्या कमतरतेवर यश मिळवण्यात तत्कालीन मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांना यश प्राप्त झाले आहे. महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी मोदी सरकारच्या विविध आंतरराष्ट्रीय पातळीवरील कर्तृत्वाचा ही आढावा घेतला. त्यांनी असे सांगितले की आज भारताची अर्थव्यवस्था जगातील सहावी अर्थव्यवस्था आहे आणि भविष्यात ती लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, तसेच श्री. नरेंद्र मोदीजी हे जागतिक पातळीवरील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात प्रभावी आणि कर्तृत्वशाली राजकीय नेते मानले जातात.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी बीजेपी सरकारचे महिलांच्या हितासाठी केलेले विविध प्रयत्न आज सभेमध्ये लोकांसमोर मांडले. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी उज्वला योजना सुरू करून महिलांना मोफत गॅस जोडणी सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच यातून त्यांची महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा भावनिक दृष्टिकोनही स्पष्ट झाला. त्याचप्रमाणे गरोदर महिलांना सहा हजार रुपये खात्यात जमा करून औषधे, विश्रांती ,आणि आरोग्यदायी अन्न असा लाभ घेता येईल यादृष्टीने योजना सुरू केली. इतकी संवेदनशील व्यक्ती असूनही श्री. मोदीजीँना काँग्रेसने महिलांच्या समस्या समजणार नाहीत असे लक्ष्य केले होते आणि याचे कारण त्यांचे वैवाहिक नाते दर्शवले होते.
कृषिमंत्री श्री पाटील यांनी पिक विमा योजनेबद्दल ही माहिती सांगितली. ते असे म्हणाले की ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, कमी उत्पादन अशा परिस्थितीमध्ये आर्थिक नुकसान भरून देण्यास उपयुक्त आहे. ते पुढे असेही म्हणाले की पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 10 पैकी फक्त 2.5 रुपये भरावे लागतात उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरते. तसेच त्यांनी दोन सरकारने दिलेले नुकसान भरपाईच्या रकमांची देखील तुलना केली. बीजेपी सरकारने 3100 करोड तर काँग्रेस सरकारने फक्त 300 करोड रुपये नुकसान भरपाई दिली होती. त्यांनी जलसंधारणाच्या विविध योजनांचा थोडक्यात आढावा घेतला. त्यांनी असे नमूद केले की मोदी सरकारच्या कारकिर्दीत जलसंधारणाच्या दृष्टीने मजबूत कार्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये विविध धरणांचे प्रकल्प ,कालव्यांची बांधकामे प्रगतीपथावर आहेत. केंद्र शासनाकडून 24000 करोड रुपयांचे योगदान जलसंधारणाच्या कामासाठी मिळाले आहे आणि शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे.
महसूल मंत्री असणाऱ्या श्री. पाटील यांनी मोदी सरकारने आणलेल्या व्यवसाय कर्जाबद्दल ही माहिती दिली. त्यांनी असे स्पष्ट केले की तरुणांना 10 दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
माननीय मंत्री पाटील यांनी असे आवाहन केले की माननीय पंतप्रधान मोदी यांनी स्त्रिया, शेतकरी, तरुण वर्ग यांच्या विकासाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. आता त्यांना नवीन कार्य काळामध्ये ही कामे अधिक पुढे नेण्यासाठी आणि देशाची सुरक्षा बळकट करण्यासाठी मत देणे आवश्यक आहे.
अनुभवी आणि तज्ञ असणाऱ्या श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या उत्कृष्ट कामाचा देखील आढावा घेतला. त्यांनी असे स्पष्ट केले की फडणवीस सरकारने आतापर्यंत सर्वाधिक कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली आहे. ही रक्कम 3400 करोड आहे आणि त्यापैकी 2100 करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसेच त्यांनी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षण मागणीसाठी केलेल्या कार्याबद्दल आणि यशाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी असे स्पष्ट केले की आतापर्यंत बरेचदा मराठा मुख्यमंत्री आणि सर्व शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या अधीन असूनही अगोदरच्या कोणत्याच सरकारला मराठा आरक्षणाची मागणी यशस्वीपणे मांडता आली नव्हती. ही मागणी 1968 पासून प्रलंबित आहे. परंतु आज फडणवीस सरकारने हे शक्य करून दाखवले आणि मराठा समाजाला 16% आरक्षण शिक्षण आणि नोकरी मध्ये प्राप्त झाले आहे. तसेच हे आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकले आहे. बऱ्याच विरोधकांनी मराठा आरक्षणाला न्यायालयात अवैध ठरवण्याचा देखील प्रयत्न केला होता.
फडणवीस सरकारची दुसरी महत्त्वाची कामगिरी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आहे. या गोष्टीसाठी आमच्या सरकारला टीआयएसएस या संस्थेकडून धनगर समाजासंदर्भातील अहवाल मागवून पुढे मांडावा लागला. या अहवालानुसार आदिवासी जमातींच्या नुसारच धनगर समाजाला आरक्षण आणि सुविधा उपलब्ध होतील. यापूर्वी काँग्रेस सरकारने केंद्र सरकारकडे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी फक्त निवेदने पाठवली होती. परंतु आधारभूत कागदपत्रे काहीच नसल्यामुळे ती रद्द झाली होती. आज आमचे सरकार धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कटिबद्ध आहे आणि यशस्वी झाले आहे. त्याचप्रमाणे सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ असे नामकरणही करण्यात आले.
भाषणाचा समारोप करताना महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी लोकांना बीजेपी आणि मोदी सरकारला मत द्या असे आवाहन केले. कारण श्री. नरेंद्र मोदी आणि श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी तुमचे एक मत आम्हाला द्या आणि आम्ही तुम्हाला भारताचा चेहरामोहरा बदलून दाखवू असे सांगितले होते, याची सुरुवात आता झालेली आहे. गमतीने पुढे ते असेही म्हणाले की श्री. राजू शेट्टी यांना पराभूत करण्यासाठी बीजेपीची गरज नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस दोन्ही यासाठी पुरेशा आहेत. शेवटी त्यांनी लोकांना असे आवाहन केले की बीजेपी उमेदवार श्री. धैर्यशील माने यांना मते देऊन आगामी निवडणुकांमध्ये विजयी करा.

Comments

Popular posts from this blog

Ichalkaranji city’s water supply problem will be solved by coordinating with the city's water supply scheme Under Mr Chandra Dada Patil.

Glorious Journey of Chandrakant Dada Patil

Chandrakant Dada Patil On Water Supply Work Tenders Extended Up to 15th June