श्री चंद्रकांत दादा पाटील — एक परिपूर्ण लोकनेता
आज मला अतिशय आनंद होत आहे ही बातमी सांगताना की महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर 2018 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वरळी येथे मोठ्या दिमाखदार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये राजकारण, खेळ, चित्रपट, मास-मिडीया अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा समावेश होता.
श्री चंद्रकांत दादा पाटील हे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अष्टपैलू आणि गौरवशाली म्हणून उल्लेख करावे असे आहे. त्यांचा प्रवास समाजासाठी शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायक ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर या छोट्या गावातून त्यांच्या वडिलांना नोकरीसाठी मुंबईला जावे लागले मफतलाल मिल मध्ये त्यांना चहाचा किटली वाला म्हणून नोकरी मिळाली, त्यामुळे श्री चंद्रकांत दादा पाटीलयांनी असंघटित कामगारांचा प्रवास लहान वयातच पाहिला आहे. त्यांचे शिक्षण बालपण मुंबई मध्ये गेले शेतकऱ्यांच्या प्रति त्यांना असणारा आदर वेळोवेळी समोर आला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या माहितीनुसार त्यांचा शेतकऱ्यांसाठी दहा हजारी योजना सुरु करण्याचा मानस आहे. 50000 रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर शेतकऱ्याला त्याच्या पत्नीच्या खात्यावर 60 हजार रुपये इतकी रक्कम काही महिन्यांमध्ये मिळू शकेल. या योजनेतून शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचा फायदा होईल शेतकऱ्यांच्या पत्नीला खात्याचे अधिकार दिल्यामुळे चंद्रकांत दादा पाटील यांचा स्त्रियांविषयीचा आदर प्रदर्शित होत आहे. श्री चंद्रकांत दादा पाटील असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत. अटल पेन्शन योजना ही सरकारची असंघटित कामगारांसाठीची पेन्शन योजना जास्तीत जास्त कामगारांनी उपयोगात आणावी यासाठी श्री चंद्रकांत दादा पाटील प्रयत्न करतात.
महसूल खात्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्याबरोबरच सामाजिक बांधिलकी मधून बऱ्याच उपयुक्त गोष्टी ते करत आहेत भोर तालुक्यातील एक छोटे खेडे गाव त्यांनी दत्तक घेतले आहे. या गावाचा परिपूर्ण विकास करण्याचा प्रयत्न ते करतात नुकतेच त्यांनी तेथील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटण्याचा उपक्रम यशस्वी केला. श्री चंद्रकांत दादा पाटील यांची विद्यार्थ्यांविषयीची आस्था यामधून लक्षात येते. समाजातील सर्व घटकांविषयी त्यांना वाटणारी आपुलकी हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. शेतकरी कामगार विद्यार्थी या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. इतक्या उच्च पदावरील व्यक्ती असूनही त्यांचा इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय वाखाणण्यासारखा आहे . राज्याचे महसूलमंत्री असूनही त्यांना विविध शैक्षणिक संस्थांच्या कार्यक्रमांची आमंत्रणे येतात आणि त्यांना विद्यार्थ्यांबरोबर हितगुज करण्यासाठी असे कार्यक्रम आवडतात. ते विद्यार्थ्यांना नेहमीच असा सल्ला देतात की पुस्तकी अभ्यासापेक्षा कौशल्य विकासावर भर द्या. ते एक विद्यार्थीप्रिय नेते आहेत.
श्री चंद्रकांत पाटील यांच्या आत्तापर्यंतच्या यशामध्ये त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा देखील महत्वाचा सहभाग आहे. महाराष्ट्रातील पाणीप्रश्न नेहमीच बिकट राहिला आहे. श्री चंद्रकांत पाटील यांनी गुजरात मध्ये एका वेगळ्या माध्यमातून पाणी प्रश्नावर कसा तोडगा काढला आहे ते अभ्यासले आहे. जमिनीच्या पोकळीत पावसाचे पाणी साठवणूक करून उन्हाळ्यात व गरजेच्या वेळी ते वापरता येईल असा प्रयत्न यामागे करण्यात आला आहे. श्री चंद्रकांत पाटील यांची अशी इच्छा आहे की याच प्रकारचा प्रयत्न महाराष्ट्रातही करण्यात यावा व त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. स्वतःचे कार्यकाळ सांभाळून इतर सामाजिक जाणिवा ठेवण्याचे काम खूप कमी राजकारणी करतात. याचे मुख्य कारण संवेदनशीलतेचा अभाव आहे. श्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख एक अतिशय संवेदनशील आणि सामाजिक भान असणारा नेता असे करावे लागेल.
श्री चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील प्रश्नांची परिपूर्ण जाणीव आहे. मुंबईत राहिल्यामुळे शहरी जीवनाचे फायदे तोटे दोन्ही त्यांनी अनुभवले आहेत. राजकारणामध्ये असाच नेता जनतेला कार्य केल्याचे समाधान देऊ शकतो ज्याने स्वतः वेगवेगळ्या परिस्थितींमधून प्रश्नांचा सामना केला आहे. श्री चंद्रकांत पाटील यांच्या अनुभवी राजकारणाचा फायदा नक्कीच महाराष्ट्रातल्या जनतेला होत आहे आणि भविष्यामध्ये ही होईल.
श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महसूल खात्याची जबाबदारी यशस्वीपणे निभावली आहे तसेच इतरही महत्त्वाच्या खात्यांचा समावेश त्यांच्याकडे आहे. अतिशय संयमित व्यक्तिमत्त्व असणाऱ्या श्री चंद्रकांत पाटील यांचे संबंध त्यांच्या सहकार्यांबरोबर अतिशय चांगले आहेत. श्री चंद्रकांत पाटील हे स्वतः अनुभवी, मुरब्बी राजकारणी असून गुणग्राहककही आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली श्री चंद्रकांत पाटील यांनी उत्कृष्ट कार्य करून आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. राजकारणामध्ये खूप यश मिळूनही ज्यांची नाळ जमिनीशी जोडली गेली आहे असे फारच थोडे राजकारणी आहेत आणि चंद्रकांत दादा पाटिल यांचा समावेश नक्कीच अशा लोकांमध्ये होतो. ते खऱ्या अर्थाने लोकनेते आहेत. श्री चंद्रकांत दादा पाटील यांचा प्रवास एका साध्या कुटुंबातून सुरू झाला. एक कार्यक्षम मंत्री आणि आता महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर 2018 असा लोकमत चा सन्मान — त्यांची कामाप्रती असणारी निष्ठा आणि लोकसहभागातून समाजात बदल करण्यासाठी असणारी तळमळ त्यांना एका वेगळ्या उंचीवर पोहोचवते. आज त्यांना मिळालेला पुरस्कार ही त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यांची पोचपावती आहे. आणि पर्यायाने समाजाच्या त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा आता अजून वाढल्या आहेत. श्री चंद्रकांत दादा पाटील हे असे नेते आहेत की यांची लोकप्रियता समाजातील सर्वच घटकांमध्ये दिसून येते. त्यांच्याकडून उत्तरोत्तर अशीच दिमाखदार कामगिरी होत राहो आणि राजकारणातील त्यांच्यावरील जबाबदारी योग्य रीतीने पार पडू दे. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीसाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा.

Comments
Post a Comment