अनरिव्हेल नाशिक संकेत स्थळाचा उद्घाटन समारंभ — श्री. चंद्रकांत दादा पाटील
माननीय महसूल आणि कृषी मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतेच नाशिक येथे अनरिव्हेल नाशिक या संकेतस्थळाच्या उद्घाटनाला उपस्थिती लावली. या संकेतस्थळाची निर्मिती हॉटेल गेटवे नाशिक आणि नाशिक जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमादरम्यान माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील असे म्हणाले की पर्यटन व्यवसायावर जास्तीत जास्त केंद्रित लक्ष केंद्रित करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्थळांचा समावेश पर्यटन स्थळांमध्ये झाला पाहिजे आणि यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला निश्चित फायदा होईल.
या कार्यक्रमाला इतर उपस्थितांमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश महाजन, खासदार श्री. हरिश्चंद्र चव्हाण, महापौर श्रीमती रंजना भानसी, आमदार श्री. बाळासाहेब सानप, डॉक्टर राहूल आहेर, सीमा हिरे, प्रदेशीय आयुक्त राजाराम माने, पोलीस आयुक्त श्री. रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलीस अधीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी निलेश सागर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. योगेश चौधरी उपस्थित होते.
माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यावेळी असे म्हणाले की या संकेत स्थळामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध अशा दोन्ही पर्यटनाच्या ठिकाणांची सविस्तर आणि परिपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे. अनेक पर्यटकांना आता या पर्यटन स्थळांना भेट देणे सहज शक्य झाले आहे. या प्रकारच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील उत्पन्नाची साधने वाढली असून स्थानिक लोकांसाठी स्वयंरोजगार संधीही निर्माण झालेली आहे. पर्यटनाचा विकास जिल्ह्याच्या आर्थिक वाढीसाठी निश्चितच आवश्यक आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश महाजन यावेळी असे म्हणाले की नाशिक जिल्हा कृषी, धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिक ,आणि साहसपूर्ण पर्यटन स्थानांनी समृद्ध आहे. या संकेत स्थळाच्या प्रयत्नांमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यटनाचा विकास होऊन स्थानिक लोकांसाठी स्वयंरोजगार संधी उपलब्ध होतील आणि लोकांची आर्थिक प्रगती होऊन या विभागाचा विकास होऊ शकेल. आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यटनाचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या विकासाला चालना मिळण्यासाठी सर्व प्रकारच्या नवीन सूचनांचे स्वागत केले जाईल.
या कार्यक्रमादरम्यान श्री. सिंघल यांना आयर्न मॅन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संकेतस्थळाच्या निर्मितीमध्ये सहाय्य करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. श्री. सिंगल म्हणाले की या माध्यमातून आम्ही नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्णन म्हणाले की या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना जागतिक स्तरावर स्थान प्राप्त झाले आहे.
या संकेतस्थळावर नाशिक जिल्ह्यातील विविध तिर्थस्थळे, ऐतिहासिक स्थळे, द्राक्षांचे प्रक्रिया प्रकल्प ,नाशिक जिल्ह्याचे राहणीमान संस्कृती आणि खाद्यसंस्कृती अशा विविध विभागांचा समावेश आहे. या संकेतस्थळावर नाशिक जिल्ह्यातील विविध पौराणिक आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती सविस्तर दिलेली आहे. यावेळी संकेतस्थळ निर्मिती करणाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांचा अशा पद्धतीच्या या कार्यक्रमांमध्ये असणारा सहभाग हा त्यांची विकासाची दृष्टी स्पष्ट करतो. त्यांची पर्यटन विकासाला राज्याच्या आर्थिक उन्नतीसाठी माध्यम म्हणून वापरण्याची विचारधारणा अत्यंत प्रभावी असून, त्यांनी पर्यटन विकासासाठी केलेले विविध प्रयत्न नेहमीच प्रामुख्याने दिसण्यात आलेले आहेत.
Comments
Post a Comment