राजकारणी व्यक्तींमध्ये सहृदय नाते आणि मैत्री आवश्यक









कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी एम.आय.आर.डी. संस्थेच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. ह्या कार्यक्रमादरम्यान ते असे म्हणाले की जिल्ह्यातील सर्व राजकारणी व्यक्तींमध्ये मैत्रीपूर्ण, सहृदय नाते असणे गरजेचे आहे. ते असेही म्हणाले की एम.आय.आर.डी. या संस्थेला सर्वतोपरी मदत करण्यास सरकार तयार आहे,जेणेकरून एम.आय.आर.डी. संस्था त्यांचे कार्य पूर्णत्वास नेऊ शकेल.
माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभाला तसेच शरद सामंत शैक्षणिक पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली. माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यावेळी असे म्हणाले की सामाजिक संस्थांना त्यांचे कार्य आणि विविध उपक्रम योग्य रीतीने सुरू ठेवणे हे खूप कठीण आणि वेळकाढू काम असते, त्यामुळे एम. आय.आर. डी. सारख्या संस्थांनी यावर संशोधन करणे गरजेचे आहे. ज्यामुळे इतर सामाजिक संस्था अधिक चांगल्या रीतीने कार्य करू शकतील. एम. आय. आर. डी. सारख्या संस्था या संशोधनासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करू शकतात आणि उपलब्ध माहितीवर संशोधन होऊ शकते. या संदर्भात जर काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष हाती आले तर सामाजिक संस्था अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतील. तसेच सरकार सामाजिक संस्थांच्या पाठीशी उभे असेलच.
या कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये आमदार श्री.सतेज पाटील, आमदार श्री.सुजित मिणचेकर, श्री.संजय पवार, श्री.अर्जुन माने,श्री.अजित तारळेकर,श्री.पी डी देशपांडे आणि श्री.संजय परुळेकर उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक श्री. शरद सामंत यावेळी म्हणाले इमारतीचे कार्य आम्ही मुदतीपूर्वी पूर्ण केले आणि हे करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. त्यांनी माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना अशी तक्रारही केली की धर्मादाय आयुक्त कार्यालयामधून फारशी चांगली दखल घेतली गेली नाही.
माननीय महसूल मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील यावेळी म्हणाले की राजकारणी नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण आणि सहृदय नाते असणे गरजेचे आहे. त्यांनी एकमेकांबरोबर संध्याकाळी चहापानाला एकत्र आले पाहिजे. राजकीय वाद हे राजकारणा पुरते मर्यादित असले पाहिजेत. राजकारणी व्यक्ती एकमेकांशी चांगली मैत्री ठेवू शकतात.
माननीय कृषिमंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले की राज्याच्या उत्पन्न आणि महसुलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. श्री. सतेज पाटील आमच्यावर टीका करत असतील परंतु आम्हाला जीएसटीच्या माध्यमातून अधिक महसूल प्राप्ती होत आहे. फक्त स्टॅम्पच्या माध्यमातून 29 हजार कोटी रुपये इतका महसूल प्राप्त झाला आहे आणि ही रक्कम देखील राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी पुरेशी आहे.
गमतीने ते पुढे असेही म्हणाले की आमचे परममित्र श्री. सतेज पाटील हे नेहमीच सर्वांना मदत करण्यासाठी पुढे असतात जरी आज ते मंत्री नसले तरीही त्यांच्यावर देवाची कृपादृष्टी आहे आणि म्हणूनच ते सर्वांना मदत करण्यासाठी अग्रेसर असतात.
माननीय पालक मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील स्वतःला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये व्यस्त ठेवतात; याचा फायदा त्यांना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि कोल्हापूर मधील पक्षाचा विस्तार अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी होतो. शैक्षणिक पुरस्कार समारंभ आणि एम. आय. आर. डी. इमारतीच्या उद्घाटनाला त्यांची उपस्थिती प्रफुल्लित करणारी होती. त्यांनी एम. आय. आर. डी. इतर सामाजिक संस्थांच्या हितासाठी संशोधन करण्याचा दिलेला सल्ला हितकारक ठरू शकतो. तसेच राजकारण्यांमध्ये मैत्रीचे सहृदय नाते निर्माण व्हावे ही त्यांची विचारधारणा राजकारणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल आणि राजकारणी व्यक्तींची कारकीर्द अपेक्षेपेक्षा अधिक चांगली होऊ शकेल, कारण यामुळे स्पर्धा, टीका ,आणि नकारात्मक विचारधारणा राजकारणी व्यक्तींमध्ये कमी होईल.

Comments

Popular posts from this blog

Ichalkaranji city’s water supply problem will be solved by coordinating with the city's water supply scheme Under Mr Chandra Dada Patil.

Glorious Journey of Chandrakant Dada Patil

Chandrakant Dada Patil On Water Supply Work Tenders Extended Up to 15th June