पश्चिम महाराष्ट्रातील यश
23 मे 2019 ला संपूर्ण भारताने एनडीएचे भव्यदिव्य यश पाहिले आणि केंद्रात मजबूत आणि आणि स्थिर सरकारची पुन्हा नियुक्ती झाली. 350 पेक्षा अधिक जागांवरील यशामुळे पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांच्या वैभवशाली आणि ताकत पूर्ण अशा कारकिर्दीची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना-बीजेपी युतीच्या माध्यमातून 40 पेक्षा अधिक जागांचे योगदान मिळाले. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी निवडणूक मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, त्यांचे प्रयत्न आणि योगदान हे शिवसेना-बीजेपी युतीला मिळालेल्या भव्य यशाचा रूपातून समोर आले आहेत.
माननीय कृषी आणि महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये निवडणूक मोहिमेची अंमलबजावणी केली. यामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, कोल्हापूर ,सांगली,आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. या निवडणूक मोहिमेच्या परिणाम म्हणून आशादायक चित्र निकालाच्या माध्यमातून दिसत आहे. निकालाची आकडेवारी ही राजकारणातील श्री.चंद्रकांत दादा पाटील यांचे योगदान आणि महत्त्व स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये तरुण आणि बुद्धिमान असणाऱ्या शिवसेना उमेदवार श्री. धैर्यशील माने यांना विजय मिळाला आणि त्यांनी अनुभवी स्वाभिमानी पार्टीचे नेते श्री. राजू शेट्टी यांचा पराभव केला. माननीय महसूल मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील यांनी सभा आणि रॅलीच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये बरीच मेहनत घेतली होती, याचा परिणाम म्हणून तरुण उमेदवारांची नियुक्ती खासदार म्हणून झालेली पहावयास मिळते.
दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये बीजेपीच्या उमेदवाराने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत केले. असा चमत्कार कृषी मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे दिसण्यात आला. तसेच माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये श्री. रणजीत सिंग नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस उमेदवाराला पराभूत केले. याचा अर्थ असा की माननीय श्री. शरद पवार यांनी जर माढा येथून निवडणूक लढविली असती तर ते त्यात अपयशी झाले असते.
माननीय महसूल मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील यांचे घरचे मैदान कोल्हापूर येथे देखील शिवसेना उमेदवार श्री.सदाशिव मंडलिक यांचा विजय मोठ्या फरकाने साजरा करण्यात आला. माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांचे प्रयत्न सांगली येथील मतदारसंघातही दिसून आले त्यामुळे बीजेपीच्या उमेदवाराला यश मिळाले.
सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की माननीय श्री. शरद पवार यांच्या तिसऱ्या पिढीला जनतेने नाकारले. श्री. अजित पवार यांचे सुपुत्र श्री. पार्थ पवार हे मावळ येथून निवडणुकीमध्ये अपयशी ठरले. शिवसेना नेते श्री. बारणे यांनी त्यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांचे जास्तीत जास्त प्रयत्न बारामती मतदार संघासाठी केले. दुर्दैवाने या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये त्यांना यश मिळाले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बीजेपी उमेदवार सौ. कांचन कुल यांना एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभूत केले. कदाचित हा शरद पवार यांच्या बारामतीसाठी असणाऱ्या योगदानाचा परिणाम असेल. परंतु माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतलेले केलेले प्रयत्न निश्चितच मूल्यवान आहेत.
माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी जनसंपर्क, भेटी, दौरे आणि सभा यांच्या माध्यमातून अतिशय आशादायक चित्र निर्माण केले आहे. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनीही एका टीव्ही चॅनेल समोर मुलाखतीमध्ये श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांचे आभार मानले आहेत. बारामती मतदारसंघांमधील अपयश सकारात्मक रीतीने पुढील निवडणुकीचे लक्ष्य म्हणून ठरवले जाऊ शकते. माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांचे योगदान त्यांना अधिक जबाबदारी आणि सन्मान यांच्या रूपांमध्ये निश्चितच नजीकच्या भविष्यात परिवर्तित होईल.
Comments
Post a Comment