प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थी वसतिगृहाची सोय
महाराष्ट्र राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील हे नेहमीच मराठा समाजाचे सच्चे नेते मानले जातात, जे मराठा समाजाच्या हितासाठी नेहमीच प्राधान्य देतात. सध्या मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे, या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी घोषणा केली की राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये भविष्यात विद्यार्थी वसतीगृहाची सोय होणार आहे आणि सध्या दहा वसतिगृहांचे उद्घाटन तातडीने करण्यात येणार आहे.
माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृहाचे उद्घाटन कोल्हापूर येथे केले. या योजनेअंतर्गत हे पहिले वस्तीगृह स्थापन करण्यात आले आहे. या उद्घाटन समारंभावेळी त्यांनी माहिती दिली की आमच्या योजनेनुसार सर्व वस्तीगृहे नवीन ठिकाणी बांधण्यात येतील. परंतु याला वेळ लागेल म्हणून सध्या आम्ही महसूल विभागाच्या अतिरिक्त इमारतींना सुसज्ज करून त्यांचा वापर वसतिगृहासाठी करणार आहोत. या समारंभावेळी पाच विद्यार्थ्यांना वस्तीगृहाच्या खोलीच्या किल्ल्या प्रदान करण्यात आल्या.
वसतिगृहाची इमारत सुसज्ज असून येथे पिण्याचे शुद्ध पाणी, गरम पाणी अशा सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. हॉस्टेलची क्षमता 72 आहे परंतु डबल बेड पद्धतीचा वापर केला तर 92 विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहू शकतात. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली की सरकार हे मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेसाठी कार्यरत आहे तसेच मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी व्याज मुक्त कर्जाची सुविधाही उपलब्ध झालेली आहे. पाचशे तरुणांनी या सुविधेचा लाभ आतापर्यंत घेतला आहे. माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली की आम्ही मुलींसाठी देखील अशाच अद्ययावत वसतिगृहांच्या सुविधांचा विचार करीत आहोत. बऱ्याच मुलींना शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी रहावे लागते. या कामासाठी जर कोणी मदत म्हणून रक्कम केली देऊ केली तर आम्ही आभारी आहोत.
आमदार श्री. अमल महाडिक यांनी यांनी 2 लाख 51 हजार रुपये महाडिक औद्योगिक संघाकडून या वसतिगृहांच्या कामासाठी देणगी म्हणून देण्याचे मान्य केले. माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनीही लोकांना आवाहन केले की निधी आणि देणग्यांच्या रूपाने या महान शिक्षणाच्या कार्याला आणि मराठा समाजाच्या हिताला सर्वांनी हातभार लावावा.
राज्य सरकार आणि माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी मराठा समाजाच्या हितासाठी केलेले विविध प्रयत्न खरच स्तुत्य आहेत. लोकांना माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडून खूप अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा सार्थ करण्याचा प्रयत्न ते पुढे पूर्ण करत आहेत. ते खर्या अर्थाने मराठा समाजाचे सच्चे नेते आहेत आणि मराठा समाजाच्या हितासाठी सदैव झटत आहेत. त्यांनी घेतलेला महसूल विभागाच्या इमारतींचा आणि सुसज्ज करण्याचा निर्णय ज्यामुळे वसतिगृहाची सोय लवकरात लवकर होऊ शकली, यातून त्यांची कार्यतत्परता दिसून येते. मुलींना वसतिगृहाची सोय उपलब्ध करून देण्याच्या निर्णयात मुलींच्या शिक्षणाला प्रतीचा दृष्टिकोनही स्पष्ट होतो.
माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील हे मराठा समाजाच्या नेतृत्वाचा योग्य चेहरा आहेत आणि त्यांनी घेतलेल्या अफाट प्रयत्नांची पोचपावती पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या निकालाच्या दरम्यान मिळेल ज्याद्वारे त्यांच्याकडे अधिक जबाबदारी आणि पदभार येऊ शकतो.
Comments
Post a Comment